गॅस सिलिंडर आणखी 25 रूपयांनी महागला; महिनाभरात 125 रूपयांचा दणका

नवी दिल्ली  – स्वयंपाकासाठी घरगुती वापर होणाऱ्या गॅस (एलपीजी) सिलिंडरच्या दराचा भडका होण्याचे सत्र कायम आहे. सिलिंडरच्या दरात सोमवारी आणखी 25 रूपयांची वाढ झाली. ती अवघ्या पाच दिवसांतील दुसरी दरवाढ ठरली. तर, महिनाभराच्या कालावधीतील 4 दरवाढींमध्ये मिळून सिलिंडर 125 रूपयांनी महागला आहे.

सिलिंडरची (14.2 किलो वजनी) नवी दरवाढ अनुदानित, विनाअनुदानित आणि उज्ज्वला योजनेचे लाभार्थी अशा सर्व श्रेणींसाठी लागू आहे. आता देशाची राजधानी दिल्लीत सिलिंडरचा दर 819 रूपये इतका झाला आहे. मागील महिन्यात (फेब्रुवारी) सिलिंडरच्या दरात तीनवेळा वाढ झाली. सिलिंडर दरवाढीचे सत्र मागील वर्षीच्या डिसेंबरपासून सुरू आहे. तेव्हापासून सिलिंडर तब्बल 175 रूपयांनी महागला आहे.

एलपीजी सिलिंडर देशभरात एकाच दराने म्हणजे बाजारभावानुसार उपलब्ध होतो. मात्र, केंद्र सरकारकडून निवडक ग्राहकांना सिलिंडरवर अनुदान दिले जाते. पण, मागील दोन वर्षांपासून सिलिंडर दरवाढीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे देशातील महानगरे आणि प्रमुख शहरांमध्ये ते अनुदान संपुष्टात आल्यात जमा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.