नवी दिल्ली – केंद्र सरकार दर महिन्याला घरगुती गॅस सिलेंडरचे दर जाहीर करते. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलेंडरची किंमत बदलत असते. या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तेल कंपन्यांनी एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केलेले नाही. मुंबईसह अन्य शहरांमध्ये देखील किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, १९ किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरमध्ये ५५ रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे.
होईल मोठा फायदा; गॅस सिलेंडर बुक करण्याआधी ही बातमी वाचा
दरम्यान, तुमच्या घरी येणारा स्वयंपाकाचा गॅस अर्थात एलपीजी सिलेंडर तुम्ही सध्या ऑनलाईन बुकींगद्वारे घेता. हे बुकींग करतानाच ग्राहकाला त्या सिलेंडरची किंमतही ऑनलाईन अदा करायची आहे. बुकींग आणि पेमेंट झाल्यावर गॅस कंपनीकडून त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तुम्हाला एक “वन टाईम पासवर्ड’ अर्थात ओटीपी मिळेल. हा ओटीपी तुम्ही सिलिंडर घेऊन येणाऱ्यास दाखवणे गरजेचे आहे. त्याशिवाय तो डिलिव्हरी मॅन तुम्हाला सिलिंडर देणार नाही.