पाथर्डीत लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन

पाथर्डी – उज्वला गॅस योजनेंतर्गत तालुक्‍यातील चिंचपूर इजदे, करोडी, तिनखडी, धायतडकवाडी या चार गावातील सुमारे 200 लाभार्थ्यांना गॅस कनेक्‍शनचे वाटप भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील ज्या कुटुंबियांना गॅस नाहीत अशांना या योजनेचा लाभ मिळतो. महिलांचे जीवनमान उंचावणे व पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबवणाचा प्रयत्न यातून होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ खेडकर यांच्या प्रयत्नातून चिंचपूर इजदे येथील लाभार्थ्यांना उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला. चिंचपूर इजदेच्या सरपंच वैशाली गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अजिनाथ खेडकर, बाबासाहेब खेडकर, तुकाराम नागरगोजे ,मोहन खंडागळे, दत्ता खेडकर, करोडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ राजेंद्र खेडकर, बाळासाहेब खेडकर, बनाजी खेडकर, तिनखडीचे सरपंच राहुल खेडकर, उपसरपंच शिवाजी कंठाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोनमनाथ खेडकर, बबन खेडकर, कानिफ आंधळे, धायतडकवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन धायतडक, कृष्णा धायतडक आदींसह मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलतांना अमोल गर्जे म्हणाले, उज्वला गॅस योजनेतून धूरमुक्त खेडे करून महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)