कचरा सुखा और गिला…गाण्यातून स्वच्छता कर्मचाऱ्याची जनजागृती

पुणे : गेल्या काही वर्षात कचराकोंडीचे शहर म्हणून पुण्याची ओळख जगभर झाली आहे. ही ओळख पुसण्यात महापालिकेला यश आले असले तरी अद्यापही पुणेकरा मध्ये जनजागृती करण्यात महापाकिका कमी पडत आहे. त्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्चही महापालिका करते, मात्र, ऐकतील ते पुणेकर कसले. परंतु, आता पुणेकरांना आपल्या गाण्यातून कचरा समस्येचा संदेश देणारा हा पालिकेचा स्वच्छता कर्मचारी पुणेकराना चांगलाच भावाला आहे.

पर्वती परिसरात स्वच्छता सेवक असलेले महादेव जाधव हे आपल्या सुरेल गाण्यातून ही कचरा समस्या झाडण काम करताना मांडतात आणि रस्त्याने जाणारे पुणेकर तेवढयाच आत्मीयतेने ते ऐकून त्यांना दादही देत आहेत. जाधव यांचा हा गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.