पुणे – पुणेकर दररोज सुमारे 11 हजार किलो कचरा टाकत असल्याची धक्कादायक माहिती पालिकेकडून देण्यात आली.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून कचरा पेट्या ठेवण्यात येत नसून पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडूनच ओल्या व सुक्या कचऱ्याची वर्गवारी केली जाते. प्रत्येक सोसायट्यांमधील कचरा वेळेवर उचलण्यात येऊनही नागरिक सुधारण्याच्या मनःस्थितीत नाहीत.
शहरात आडवाटेला वाट्टेल तेथे कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असून परिणामी पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पुण्यातून दररोज सुमारे 5 हजार 700 किलो नॉन कोविड कचरा व सुमारे 5 हजार 500 किलो कोविड कचरा असा एकूण 11 हजार किलो कचरा जमा होतो.
कोविड कचरा रुग्णालयातून पालिका प्रशासन उचलून नेते व त्याची तळोजा येथे विल्हेवाट लावली जाते. दरम्यान, देशातील सर्वाधिक कचरा फेकणाऱ्या टॉप टेन शहरांमध्ये पुण्याचा क्रमांक लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.