Ganpati Visarjan 2024 | आजच्या अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक याशिवाय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग या सगळ्या गोष्टींचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे.
दरम्यान, पुण्याच्या वैभवशाली परंपरेचा भाग असलेल्या विसर्जन मिरवणूक या मिरवणुकीसाठी यायला खास आकर्षण असणार आहे. यावेळी विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल साडेतीनशे शंख वादक सहभागी झालेले आहेत. या साडे तीनशे शंख वादनाने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.