गणपती बाप्पा मोरया…! पुणे पोलिसांच्या वेबसाइटवरूनही मिळणार ई-पास

गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्यांना दिलासा

पुणे – गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना पोलिसांचा ई-पास बंधनकारक आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या वेबसाईटवर जाऊन नागरिकांना प्रवासासाठी हा ई-पास ऑनलाइन मिळवता येणार आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून परराज्य किंवा परजिल्ह्यात जाण्यासाठी बंदी आहे. अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठीच नागरिकांना ई-पास काढून प्रवास रवानगी दिली जात आहे. यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी जाणाऱ्या पुणे, मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांतील चाकरमान्यांसमोर प्रश्न उभा राहिला होता.

असा मिळवा पास
राज्य सरकारने ई पास देण्यासाठी सुरू केलेल्या आपल्या https://covid19.mhpolice.in/registration या वेबसाइटवर पासची ऑनलाइन नोंदणी करताना गणेशोत्सवाचाही पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

पुणे पोलिसांच्या http://Www.Punepolice.in या वेबसाइटवर माहिती भरताना मात्र “इतर’ पर्याय निवडून यासाठी अर्ज करावा लागेल. या वेबसाइटमध्ये “गणेशोत्सव’ असा पर्याय उपलब्ध नाही.

गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांनी प्रवासासाठी पोलिसांचा ई पास घेणे आवश्‍यक आहे. पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर जाऊन “इतर’ या पर्यायमध्ये नागरिकांना अर्ज करता येईल.
– बच्चन सिंग, पोलीस उपायुक्त

Leave A Reply

Your email address will not be published.