मुंबई –बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएल स्पर्धेबाबत चर्चा करण्यासाठी अमिरातीत आहेत. तिथे विलगीकरणाचा कालावधी संपल्यावर त्यांनी चक्क कार रेसिंगचा आनंद लुटला.
मात्र, करोनाचा धोका असताना त्यांच्यामुळे गर्दीला निमंत्रण मिळते, अशा शब्दांत त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका झाल्याने त्यांनी आपला रेसिंग करतानाचा व्हिडिओ व फोटो डिलीट केला.
गांगुली यांनी कार रेसिंग करून आल्यानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवर सोशल मीडियावर खूप टीका झाल्यानंतर त्यांनी फोटो डिलीट केला आहे. मात्र, त्यामुळे सोशल मीडियावर जास्तच चर्चा रंगली.
गांगुली यांनी फोटो शेअर करत कार रेसिंगचा अनुभव घेतला व त्यामुळे खूप आनंद झाला, अशी टॅगलाइन पोस्ट केली होती. त्यावर सध्या करोनाचा धोका कायम असल्याने अशा गोष्टी करताना भान ठेवा, अशी टीकाही त्यांच्यावर झाली. त्यामुळे त्यांनी सर्व फोटो डिलीट केले. मात्र, तरीही करोनाच्या सावटात असतानाही त्यांनी केलेल्या या कृतीवर टीका सुरूच राहिली आहे.