मुंबई – संजय लीला भन्साळी हे आलिया भट्टसोबत “गंगूबाई’ चित्रपट बनवित आहेत. यातील दोन गाण्यांचे चित्रीकरण अद्याप बाकी आहे. त्यापूर्वीच या चित्रपट खरेदीसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्पर्धा सुरू झाली आहे.
या चित्रपटासाठी भन्साळी यांना 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण अट अशी होती की हा चित्रपट थिएटरमध्ये न प्रदर्शित करता थेट ओटीटीवर रिलीज करावा. पण भन्साळी यांनी नकार दर्शविला.
भन्साली आणि त्यांच्या टीमचा असा विश्वास आहे की हा चित्रपट बिग स्क्रीनसाठी बनविला गेला आहे आणि तो चित्रपटगृहाच प्रदर्शित करावा. असे असूनही, भन्साळी यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरून भरघोस रक्कमेची ऑफर मिळत आहे. या चित्रपटाच्या डिजिटल हक्कांसाठी नेटफ्लिक्सने 70 कोटी रुपये भरल्याचे वृत्त आहे.
“गंगूबाई’मध्ये आलियासह अजय देवगन आणि इमरान हाश्मीदेखील मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच चित्रपटातील एक गाणे हुमा कुरेशीवर चित्रीत करण्यात आले आहे. हा चित्रपट भंसाली यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने भव्य-दिव्य असा साकारला आहे.
दरम्यान, नेटफ्लिक्ससाठी भंसाली हे “हीरा मंडी’ नामक वेबसीरिज साकारत आहेत. याचा पहिला आणि शेवटचा ऍपिसोड भंसाली दिग्दर्शित करणार आहे. यात सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, मनीषा कोईराला आणि निमरत कौर मुख्य भूमिका साकारणार आहेत.