#Gangubai Kathiawadi । आलियाची भावुक पोस्ट व्हायरल

अनेक अडथळे पार करत एकदाचे “गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली आलिया भट हिने याबाबत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. 

तिची पोस्ट चांगली व्हायरल होत असून अनेकांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. तिने संजय लीला भन्साळी आणि स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे आणि म्हटले आहे की, “8 डिसेंबर 2019 रोजी आम्ही सिनेमाचे शूटिंग सुरू केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

दोन वर्षांनी सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. सिनेमा आणि सिनेमाचा सेट दोन वेळा लॉकडाऊन आणि वादळात गेला. चित्रीकरणादरम्यान चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शन यांनादेखील करोनाची लागण झाली. याचबरोबर गंगुबाई काठियावाडी’ हा एक वेगळा सिनेमा आहे’, असेही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा माझे आयुष्य बदलवणारा अनुभव आहे. संजय भन्साळी यांच्यासोबत काम करणे हे माझे स्वप्न होते. आज मी हा सेट एक वेगळी व्यक्‍ती म्हणून सोडत आहे’, असे आलियाने म्हटले आहे.

त्याचबरोबर तिने भन्साळी यांना धन्यवाद दिले आहे. शेवटी आलिया म्हणते, “जेव्हा एखादा सिनेमा संपतो तेव्हा त्यातील एक भाग संपतो. मी आज माझा एक भाग गमावला आहे. “गंगू आय लव्ह यू! तुझी आठवण येईल’.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.