नवी दिल्ली, दि. 26 – रूपनगर कारागृहात असणाऱ्या गॅंगस्टर मुख्तार अन्सारीचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले. न्या अशोक भूषण आणि आर. एस. रेड्डी यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना ताबा देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत घालून दिली आहे. अन्सारीचा तातडीने ताबा देण्याचे आदेश पंजाब सरकार आणि रुपनगर कारागृह प्रशासनाला देण्याची मागणी करणारी याचिका उत्तर प्रदेश सरकारने दाखल केली होती.
योगी आदित्यनाथ सरकारला रूपनगर कारागृहात असणाऱ्या अन्सारीचा ताबा मागण्याचा अधिकार नसल्याचा युक्तीवाद पंजाब सरकारने चार मार्च रोजी केला होता. जानेवारी 2019 मध्ये खंडणीच्या गुन्ह्यात अटक केल्यापासून अन्सारी रुपनगर कारागृहात आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेशमध्येही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.