गॅंगस्टर इक्‍बाल मिर्चीच्या जवळच्या साथीदाराला अटक

मुंबई: अंमलबजावणी संचलनालयाने आज दाउद इब्राहिमचा साथीदार मयत गॅंगस्टर इक्‍बाल मिर्चीच्या जवळच्या साथीदाराला मनी लॉन्डरिंग प्रकरणी अटक केली. हुमायुन मर्चंट असे या साथीदाराचे नाव्‌ असून त्याला मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हुमायुन मर्चंट याला मुंबईतल्या विशेष न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.मर्चंट हा इक्‍बाल मेमन उर्फ इक्‍बाल मिर्चीचा अत्यंत जवळचा मित्र मानला जातो. सर मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या मालकीच्या वरळीतील सी व्ह्यू, मरीयम लॉज आणि रबिया मॅन्शन या तीन स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी मर्चंट जाणीवपूर्वक तेथे भाडेकरू ठेवत असे. हे भाडेकरू बनावट असायचे असे “ईडी’ने म्हटले आहे.

तसेच मर्चंटचे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी प्रमोट केलेल्या सनब्लिंक रिअल इस्टेट प्रा.लि. दरम्यानचे संबंधही “ईडी’कडून तपासले जात आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.