मेरठ – सामूहिक बलात्कारानंतर पीडित विद्यार्थीनीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना मेरठ येथील कपसाड गावात घडली आहे. पोलीसांना सुसाईड नोट सापडली असून त्यात आरोपींची नावे लिहिली आहेत. याप्रकरणी दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
कपसाड गावातील 10वीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी गुरुवारी दुपारी ट्यूशनला जात होती. त्यावेळी गावातीलच काही तरुणांनी तिला एका खोलीत नेऊन लैंगिक अत्याचार केले. घरी परतल्यानंतर विद्यार्थीनीने वीष पीऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांच्या लक्षात येताच तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान विद्यार्थीनीचा मृत्यू झाला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनीच्या घरी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात गावातीलच चार तरुणांची नावे लिहिली आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपींसह दोघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.