खळबळजनक! लस देण्याच्या आमिषाने तरुणीवर सामूहिक बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल

पाटणा, दि. 30 – कोविड वॅक्‍सीन लस देण्याच्या आमिषाने दोन जणांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रॉकी आणि मंटू अशी आरोपींची नावे असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपीने पीडित मुलीला जमुनापूर भागातील निर्जन घरात नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने विरोध दर्शविला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा नराधमांनी तिचे हातपाय बांधले आणि तोंडात रुमालही कोंबला.

यानंतर या दोघांनीही पीडित मुलीवर एकनंतर एक बलात्कार केला. ही घटना घडवून आणल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पीडिता आरोपीच्या तावडीतून सुटली आणि ती तिच्या घरी पोहोचली. तिथे तिने आपल्या कुटुंबीयांना घटनेबद्दल सांगितले, त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. आरोपी जमुनापुरात राहतात. पोलिसांनी आरोपींच्या ठिकाणी छापा टाकून त्यांना अटक केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.