नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नाशिक – नाशिकमध्ये बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. लासलगाव पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून 500 रुपयांच्या 291 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

मोहन पाटील, प्रतिभा घायाळ, विठ्ठल नाबरीया, रविंद्र राऊत, विनोद पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. लासलगाव परिसरात नकली नोटा चलनात आणल्या जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत छापा टाकुन त्यांच्याकडुन 500 रुपयांच्या बनावट 291 नोटा आणि इटीऑस कारसह सुमारे 4,00,000 रुपयांचा मुद्‌देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.