गुन्हेगारांची टोळी चिकण लॉलीपॉचे घमेले घेऊन पळाली

पुणे – आखाड महिणा म्हणजे नॉन व्हेजवर आडवा हात मारण्याचा महिणा. यामुळे घराघरांत नॉन व्हेजचा बेत असतोच तसाच मित्र मंडळींमध्ये आखाड पार्ट्यांचाही बेत रंगतो. मात्र स्वारगेट परिसरात आखाडाचा बेत ठरवणाऱ्या एका गुन्हेगाराच्या टोळीला मात्र जेलची हवा खावी लागणार आहे. या सराईत गुन्हेगाराच्या टोळीने एका केटरींग व्यवसायीकाला पैसे न देता चिकण लॉलीपॉपचे घमेलेच पळवले. तसेच विरोध करणाऱ्या दुकान मालकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला केला.

याप्रकरणी सराईत गुन्हेगार गोविंदसिंग पप्पूसिंग टाक (28,रा.गुलटेकडी) व त्याच्या इतर पाच साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील गोविंदसिंगला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी उझेर खान यांचा डायस प्लॉट येथे रब्बानी केटरर्स नावाने व्यवसाय आहे. तेथे गोविंदसिंग हा साथीदारांसह आला होता. तो दमदाटी करत मोफत चिकण लॉलीपॉप घमेले उचलून चालला होता. मात्र फिर्यादीचे चुलते सोनु शेख यांनी त्यास विरोध केला. याचा राग मनात येऊन त्याने साथीदांसह हातात कोयते पालघन घेऊन परिसरात दहशत माजवली. फिर्यादी व त्याचा चुलत भाऊ साहिल पळून जात असताना, त्यांना रस्त्यात अडवण्यात आले.

सोनू किधर है असे म्हणत साहिलच्या डोक्‍यात कोयता मारण्याच आला. त्याने तो वार हुकवला, मात्र दुसरा वार त्याच्या पाठीवर बसला. यानंतर त्यांनी परिसरात दहशत पसरवून दोघांचाही पाठलाग केला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रसाळ करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.