मुंबई – भाद्रपद शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. आजपासून 10 दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. यादरम्यान भाविक घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजा करतील. गणेश चतुर्थीच्या दहा दिवसीय उत्सवाची सांगता 09 सप्टेंबर रोजी गणेशमूर्तीच्या विसर्जनाने होणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, नवसाला पावणारा बाप्पा अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. याच कारणामुळे या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भगणेशभक्त येथे हजेरी लावतात. गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी अभिनेता कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दर्शनाला आज सकाळीला पोहोचला होता.
View this post on Instagram
यावेळी कार्तिक आर्यन पारंपरिक लूकमध्ये दिसला. त्याने पांढरा पायजमा असलेला फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता घातलेला होता. या एकूण लूकमध्ये कार्तिक खूपच डॅशिंग दिसत होता.