ठाणे – भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरुळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्ह्यात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गणेश नाईक हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईकांचा जामीन नाकारल्यानंतर कोणत्याही क्षणी त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.
भाजप नेते गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाणे सत्र न्यायालयाने नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते.
बेलापूर आणि नेरुळ इथे दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी याचिका गणेश नाईक यांनी दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने निकाल आजसाठी राखून ठेवला होता. दरम्यान आज न्यायालयाने दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन नाकारला आहे.