कोळगाव (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश खोमणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दि. 4 ऑगस्ट रोजी तत्कालीन उपसरपंच सरिता भुषण बडवे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली.
घारगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच अरूणा रमेश खोमणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलावण्यात आली होती, यावेळी उपसरपंच पदासाठी जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांचे समर्थक असणारे गणेश खोमणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या निवडीवेळी जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बापुराव निंभोरे, घारगाव सोसायटीचे मा. चेअरमन बापुराव शिंदे, रमेश कळमकर, रमेश खोमणे, सुनिल कळमकर, संतोष खोमणे, अशोक पानसरे तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.