सातारा- सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. शहरातील मोती चौकातून निघालेली मिरवणूक कमानी हौद परिसरात पोहचली असून यावेळी गुलालाच्या उधळणीत ढोल ताशा पथकाच्या गजरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीस उत्साहात सुरूवात झाली आहे. यावेळी पावसाने उघडीप दिल्यामुळे लोकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याचे पाहयला मिळत आहे.