11 रुपयांमध्ये गणेशमूर्ती…

महर्षीनगर येथे भरत सुराणा यांचा अनोखा उपक्रम
महर्षीनगर (प्रतिनिधी) –
करोनाच्या संकटात…, आपणही समाजाचे काही देणं लागतो. या विचारातून सामाजिक कार्यकर्ते भरत सुराणा व योगिता सुराणा यांनी अनोखा उपक्रम राबवित महर्षीनगर, मुकुंदनगर औद्योगिक वसाहतीतील नागरिकांना केवळ 11 रुपयांमध्ये गणेशमूर्ती उपलब्ध करून दिली. अभय छाजेड यांच्या हस्ते श्रींच्या मूर्ती देऊन शुभकार्याची सुरुवात करण्यात आली.

यावेळी छाजेड म्हणाले की, यापुढील काळात सणोत्सव साजरे करताना माणुसकी जपत गरजूंना मदत करणे गरजेचे ठरणार आहे. हा उपक्रम स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरज राजगुरू, नितीन निकम, परमेश्‍वर हुसंगे आदींच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन भरत सुराणा, योगिता सुराणा यांनी केले. दीपक शेलकर, शनी खरात, हेमांशू सुराणा, नेहल सुराणा, साई उपाध्याय यांनी योगदान दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.