गांधींचे विचार प्रेरणादायी : ना. थोरात

संगमनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसा ही शिकवण संपूर्ण जगाच्या शांततेसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यशोधन संपर्क कार्यालयात संगमनेर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त एकता संमेलन व हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, विश्‍वासराव मुर्तडक, इंद्रजित थोरात, गुलाबराव ढोले, प्रा. बाबा खरात, ऍड. त्र्यंबक गडाख, सुरेश थोरात, ज्ञानेश्‍वर राक्षे, नवनाथ अरगडे, आर. एम. कातोरे, तनवीर पठाण, के. के. थोरात, प्रा. ज्ञानेश्‍वर गायकवाड, अनिल सातपुते, नितीन अभंग, सुभाष सांगळे, रोहिदास सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. थोरात म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला भारताची ओळख करुन दिली. सत्य व अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढ्याची लोक चळवळ उभारतांना देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यागाची व बलिदानाची शिकवण देणाऱ्या गांधी यांच्या विचारांची आज जगाला गरज असून, त्यांचे जीवनकार्य भारतीयांसाठी सदैव प्रेरणादायी ठरले आहे.

आ. डॉ. तांबे म्हणाले, महात्मा गांधी यांचे जीवन कार्य हे पूर्ण संघर्षातून उभे राहिलेले आहे. ब्रिटिशांच्या अत्याचाराला त्यांनी अहिंसेतून उत्तर दिले. नव्या पिढीने गांधीजींच्या जीवन चरित्राचा अभ्यास करावा. दत्तात्रय थोरात, शिवाजी गोसावी, तात्याराम कुटे, किशोर टोकसे, दत्तू कोकणे, गौरव डोंगरे, भास्कर आरोटे, रमेश गफले, तान्हाजी शिरतार उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.