पुणे – गांधी कुटुंबीयांना फेसबुकवरून धमकी; शहर कॉंग्रेसची पोलिसांत तक्रार

पुणे – अलिगड येथे हिंदू महासभेच्या कार्यकर्ते व नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर प्रतिकात्मक गोळ्या झाडल्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेविरोधात पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सोशल मीडियाचे प्रमुख चैतन्य पुरंदरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टवर नीती गोखले नामक महिलेने कॉमेंट करत गांधी कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी शहर कॉंग्रेसच्यावतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी 30 जानेवारी रोजी अलिगड येथे हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडून नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. पुरंदरे यांनी आपल्या वॉलवर 30 जानेवारी रोजी “बापू हम शर्मिंदा हैं…. तेरे कातिल अभी भी जिंदा हैं’ अशी पोस्ट टाकली होती. या पोस्टवर नीती गोखले नामक महिलेने कमेंट करत “अजून दोन गांधी आहेत. त्यांचा वध करायला एक नथुराम गोडसे हवे’ अशी कमेंट केली असल्याने या महिलेच्या विरोधात शहर कॉंग्रेसकडून आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याचे शहर कॉंग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)