काठमांडू – गेल्या 48 तासांपासून नेपाळमधील गंडक नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे उत्तर बिहारच्या जिल्ह्यांना पुराचा धोका उद्भवला आहे. यामध्ये पूर्व आणि पश्चिम चंपारण, सारण, सिवान आणि गोपाळगंज या जिल्ह्यांचा समावेश आहे.
गंडक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून वाल्मिकीनगर गंडक धरणातून चार लाख क्युसेक पाणी सोडल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर दिसत आहे.
सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. पटणा, गया, नवादा आणि बेगूसराय या जिल्ह्यांसह राज्याच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गुरुवारी भारतीय कर्मचाऱ्याचा मृतदेह सिंधुलीतील सुनकोशी नदीत सापडला. तर सिंधुपाल्चोक येथे दोन चिनी मृतावस्थेत सापडल्याचे मुख्य जिल्हा अधिकारी अरुण पोखरेल यांनी सांगितले. हे लोक मेळमची पाणीपुरवठा प्रकल्पात काम करायचे.