गणरायाच्या प्रिय “दूर्वा” अनेक व्याधींवर आहे रामबाण औषध !

गवताच्या जातीची वनस्पती म्हणजे दूर्वा होय.. श्रीगणेशाला प्रिय अशा दुर्वा प्रत्येकाने पाहिल्या आहेत. याच्या दोन जाती आहेत. एक पांढरी व दुसरी निळी. या दोन्हीचे अनेक औषधी उपयोग आहेत. ( health benefits of durva grass )

घोळणा फुटला असता : दुर्वा अतिशय थंड असतात. नाकातून घोळणा फुटून रक्‍त येत असल्यास, दुर्वांचा रस खडीसाखर घालून दिल्याने ते त्वरित थांबते.

विषमज्वराच्या तापावर : तापातील उष्णता कमी होण्याकरिता दुर्वांचा रस उपयोगी पडतो. विषमज्वरात ताप ज्यावेळी फार वाढतो.त्यावेळी तापाची उष्णता डोक्‍यावर बाधू नये म्हणून दूर्वा व तांदूळ एकत्र वाटून त्याचा जाड लेप केल्यास तापाची उष्णता मस्तकास बाधत नाही. अंगाची आग अतिशय होत असते. अशावेळी दुर्वांचा रस हे एक स्वर्गीय अमृतपेय आहे. ( health benefits of durva grass )

लघवी साफ होण्यासाठी : लघवीला होत नसेल, थेंब थेंब होत असेल, तर दुर्वांचा रस दिल्याने लघवी साफ होते. लघवीचा तांबडा रंग पालटला जातो.

रक्‍तातिसारात फायदा : विषमज्वरात तापाने कोठा फुटून अतिसार व याचा परिणाम म्हणून रक्‍तातिसार होतो; अशा वेळीदुर्वाचा रस दिल्याने फार बरे वाटते. आगीजवळ काम करीत असता जे रोग होतात ते दुर्वांच्या रसाने बरे होतात.

खाज तसेच त्वचारोगावर : रक्‍त अशुद्धीच्या विकारात म्हणजे खाज सुटते, अंगावर चकंदळे पडतात तेंव्हा दुर्वांचा रस घेतला असता खाज कमी होते.

आगपैणीवर : आगपैणी बरी होण्याकरिता दुर्वा व तांदळाचा लेप लावला असता आगपैण बरी होते.
धावरे झाले असता : धावऱ्यासही दुर्वा वाटून लावल्या असता बरे होते.अशाप्रकारे उष्णतेच्या अनेक विकारांवर दुर्वांचा रस अत्यंत उपयुक्‍त आहे.( health benefits of durva grass )

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.