गुंतवणूकदारांची लॉटरी! 5 बोनस शेअर्स देणार ‘ही’ कंपनी, स्टॉकची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी

Gamco Ltd Bonus Share | शेअर बाजारात पडझड सुरू असताना देखील अनेक कंपन्या बोनस शेअर्स आणि डिव्हिडंडची घोषणा करत आहेत. आता गॅम्को लिमिटेड या कंपनीने बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
कंपनी गुंतवणूकदारांना 5 शेअर्स बोनस देत आहे. गॅम्को लिमिटेडने बोनस जारी करण्यासाठी रेकॉर्ड डेट देखील निश्चित केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.
गॅम्को लिमिटेडने बीएसईला बोनस शेअरबाबत माहिती दिली आहे. Gamco Ltd ने माहिती दिली की, 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवरील 4 शेअर्सवर 5 शेअर बोनस स्वरुपात देणार आहे. या बोनस शेअर्ससाठी कंपनीने 21 मार्च 2025 तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, या तारखेपर्यंत ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना बोनस शेअर्सचा फायदा मिळेल.
गॅम्को लिमिटेडचे शेअर विभाजन गेल्या वर्षी झाले होते. कंपनीने जून महिन्यात एक्स-स्प्लिट ट्रेडिंग केले. कंपनीने त्यावेळी शेअर्स 5 भागात विभागले होते. या शेअर विभाजनानंतरच कंपनीच्या शेअर्सचे फेस व्हॅल्यू प्रति शेअर 2 रुपयांपर्यंत कमी झाले. 2024 मध्ये कंपनीने प्रति शेअरवर एक रुपया डिव्हिडेंड देखील दिला होता.
दरम्यान, Gamco Ltd च्या शेअर्सची किंमत सध्या 78 रुपये आहे. शेअर्सची 52 आठवड्यातील उच्चांकी पातळी 148 रुपये, तर निच्चांकी पातळी 41.70 रुपये होती.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





