कोपरगाव- शहरापासून जवळच असणाऱ्या संवत्सर शिवारामध्ये पोलिसांनी विना परवाना बेकायदा जुगार खेळत असलेल्यावर मोठा छापा टाकला असून त्यात 33 हजार 890 रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य देखील जप्त केले आहे कोरोणाचा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचा साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा व जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरात लॉक डाऊन सुरू असतानादेखील जुगार खेळण्याची सवय मात्र या आरोपींच्या अंगलट आली आहे सदर घटना 27 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेचार वाजता घडली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यांमध्ये सध्या संचारबंदी लागू असताना देखील राहता तालुक्यातील कोल्हार व सावळीविहीर येथील देखील काही आरोपी पत्ते खेळण्यास खास कोपरगावला आले असल्याचे उघड झाले आहे.
पोलीस कॉन्स्टेबल विजय सिद्धार्थ धनेधर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रुपेश बधीनारायण पुरोहित रा. गांधी चौक ,योगेश बाळासाहेब जाधव रा.गांधीनगर, छोटू यासीन पठाण रा.गांधीनगर ,चेतन परशुराम धुमने रा.संजयनगर, इब्राहिम रमजान शेख रा., धरणगाव रोड ,नितिन बाळकृष्ण वाघमारे रा.,लक्ष्मीनगर, सिकंदर अरमान शेख रा.,इंदिरानगर ,नयिन सलीम सय्यद रा.कोल्हार तालुका राहता ,बबन मारुती मंजुळ रा. गांधीनगर, डेव्हिड दत्तू गायकवाड रा. सावळीविहीर ,कलीम भिकन बागवान रा., इंदिरानगर ,कैलास नारायण लुटे रा. कोल्हार, रामदास भिकाजी केकान रा.जेऊर पाटोदा, रामदास गायकवाड रा.मनाई वस्ती असे आरोपी सदर जुगार खेळताना मिळून आले आहेत.
मनाई वस्ती येथील कचरा डेपो च्या शेजारी असलेल्या एका बाभळीच्या झाडाखाली सदर आरोपी हे विनापरवाना बेकायदा गोलाकार बसून तिरट नावाचा हार-जीत जुगार खेळताना 34 हजाराचा रोकड रकमेसह व जुगाराच्या साहित्यासह मिळून आले आहे पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला असून संचारबंदी उल्लंघनाचा देखील गुन्हा दाखल केला आहे