नवी दिल्ली – पूर्व दिल्लीतून खासदार म्हणून कार्यरत असलेल्या क्रिकेटपटू गौतम गंभीरने एका महिला क्रिकेटपटूच्या मदतीला धावून जात आपल्यातील कर्तव्यदक्षतेची साक्ष दिली. या क्रिकेटपटूने गेल्या महिन्यात गंभीरकडे आपल्या प्रशिक्षकाबद्दल तक्रार करत मदतीची याचना केली होती.
आपल्या प्रशिक्षकाने कारकीर्द संपविण्याची धमकी देत विनयभंग केला, तसेच अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला, असे या महिला क्रिकेटपटूने गंभीरला पाठविलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. गंभीरनेही घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रशिक्षकाचा भांडाफोड केली. या प्रशिक्षकावर गुन्हा नोंदविला गेला असून त्याला अटक होऊ शकते.