‘३० नोव्हेंबर’पर्यंत दंड न भरल्यास वाहनचालक होणार गजाआड

मुंबई – आता वाहनचालकांनी दंड न भरल्यास त्यांना थेट वॉरंट काढून अटक करण्यात येणार आहे. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी राज्यातील वाहतुक पोलीस नेहमीच आपल्या परीने प्रयत्न करत असतात. पण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलीस चालकांकडून दंड, वाहनाची कागदपत्रे किंवा परवाना जप्त कर करत असे. त्यातच आता ‘ई- चलन’ प्रकार अस्तित्वात आल्यापासून वाहनाची कागदपत्रे किंवा परवाने जप्त केली जात नाही.

दरम्यान, काही नागरिक ‘ई- चलन’ प्रणालीचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, ही प्रणाली लागू झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चलन पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आता थकविलेले ‘ई- चलन’ भरण्यासाठी आणखी १० दिवसांची म्हणजे, ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत दंड न भरल्यास वाहन चालकांना थेट अटक होणार आहे.

वाहन चालकांनी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत दंड न भरल्यास चालकाला थेट नोटीस पाठवली जाणार आहे. तसेच सुनावणीवेळी हजर न राहिल्यास त्यांना वॉरंट काढून अटक करण्यात येईल. तसेच दंडाबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाणारा आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.