घरफोडीचे आरोपी 12 तासांत गजाआड

सराईत तडीपार चोरट्यासह तिघांना अटक : 47 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

पिंपरी – चिंचवड येथील लिंकरोड येथील हर्षदा सोसायटीत झालेल्या घरफोडीचा पोलिसांनी 12 तासाच्या आत छडा लावला असून एका सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून घरातून चोरील्या गेलेल्या दागिन्यांपैकी 47 तोळे सोने, रोख रक्‍कम असा एकूण 13 लाख 82 हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे.

अटक केलेल्या आरोपीमध्ये सध्या तडीपार असलेला सराईत चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने (वय 26, रा. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड), त्याचा भाऊ बिल्डर उर्फ शशिकांत अनंत माने (वय 22, पाणी फिल्टर स्टेशनसमोर, पत्राशेड लिंकरोड, चिंचवड) आणि मित्र कम्या उर्फ कमलेश दिलीप कसबे (वय 22, रा. पाणी फिल्टर स्टेशनसमोर, पत्राशेड लिंकरोड, चिंचवड)यांना पोलिसांनी अटक केली आहे. , सोमवारी (दि.29 जुलै) लिंक रोड चिंचवड येथील हर्षदा सोसायटीतील घरातून 50 तोळे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्‍कम चोरट्यांनी चोरुन नेली होती. तपास पथकातील पोलीस नाईक सुधाकर अवताडे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, चिंचवड येथील तडीपार सराईत घरफोड्या करणारा चोरटा चंद्या हा वाल्हेकरवाडी येथील राजयोग पेट्रोल पंपाजवळ फिरत आहे. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चिंचवड येथील घरफोडी घरफोडीबाबात चौकशी केली असता त्याने त्याचा भाऊ बिल्डर उर्फ शशिकांत आणि मित्र कम्या उर्फ कमलेश सोबत मिळून हर्षदा सोसायटीतील घरफोडी आणि अंबिका दुकानात चोरी केल्याचे कबूल केले. त्यांनतर पोलिसांनी त्याचा भाऊ बिल्डर आणि मित्र कम्या या दोघांना लिंक रोड पत्राशेड समोरील मोकळ्या इमारतीतून अटक केली. या तिघांकडून 47 तोळे सोने, 460 रुपयांची नाणी असा एकूण 13 लाख 82 हजार 373 रुपयांचा ऐवज जप्त केला असून त्यांच्यावर पुढील कारवाई चिंचवड पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्‍त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे, पोलीस हवालदार दत्तात्रय गायकवाड, पांडुरंग जगताप व इतरांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.