मिरवणुकीसाठी दिलेली आलिशान गाडीही जप्त
पुणे – गुंड गजा मारणे याच्या मिरवणुकीसाठी महागडी मोटार देणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 50 लाख रुपयांची महागडी कार (जॅग्वार) जप्त करण्यात आली आहे.
राकेश पठारे (33, रा. यशवंतनगर, खराडी) असे अटक झालेल्या गुंडाचे नाव आहे. मारणे याची तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर त्याने मोटारींच्या ताफ्यातून मिरवणूक काढली होती.
मारणेला मिरवणुकीसाठी पठारेने महागडी कार उपलब्ध करून दिली होती. या प्रकरणी सराईतांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पठारे पसार होता. तो खराडी परिसरात थांबल्याची माहिती पोलीस नाईक शैलेश सुर्वे यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून पठारेला पकडण्यात आले.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ यांनी ही कारवाई केली.