‘गैरों पे करम अपनों पे सितम’; ओवैसींची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली – युरोपियन युनियनचे २८ खासदारांचे शिष्टमंडळ आज भारत दौऱ्यावर असून ३७० कलम हटविल्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते जम्मू-काश्मीरमध्ये गेले आहेत. या दौऱ्यावरून आता एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर शायरीतून टीकास्त्र सोडले आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी म्हणाले कि, परराष्ट्र मंत्रालय अशा लोकांना काश्मीरमध्ये पाठवत आहे जे इस्लामोफोबिया या आजाराने ग्रस्त आहेत. ‘गैरों पे करम अपनों पे सितम, ऐ जान-ए-वफा ये जुल्‍म ना कर…रहने दे अभी थोड़ा सा धर्म…’, अशीही शायरीतून टीका केली आहे.

दरम्यान, ओवैसीसह अनेक विरोध पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.