पिचड पितापुत्रांसह गायकर यांचा भाजपात प्रवेश

अकोले – राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री मधुकरराव पिचड त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभवराव पिचड व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह पिचड यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ना.सुधीर मुनगंटीवार, ना.गिरीश महाजन, ना.राधाकृष्ण विखे पाटील, ना.राम शिंदे, ना. विनोद तावडे, ना.सुभाष देशमुख, खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आ.मंदा म्हात्रे, मंगल प्रभात लोढा, मधू चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी मधुकर पिचड म्हणाले, आपण वयाची 79 पार केली असून महाराष्ट्र व तालुक्‍यातील जनतेने खूप प्रेम दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, देशात नरेंद्र मोदी यांचे काम चांगले आहे. देश व राज्य ज्या बाजूने चालला आहे. त्या बाजूने गेले पाहिजे म्हणून आपण पक्ष प्रवेश केला असल्याचे ते म्हणाले.

या पक्ष प्रवेश सोहळ्यास राजूरच्या सरपंच हेमलताताई पिचड, भाजपचे जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, मीनानाथ पांडे, गिरजाजी जाधव, अशोकराव देशमुख, ऍड. के. डी. धुमाळ, परबतराव नाईकवाडी, जि. प. सदस्य रमेशराव देशमुख, माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, रावसाहेब वाकचौरे, जे. डी. आंबरे, विठ्ठलराव चासकर, यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे, रावसाहेब वाकचौरे, गोरख मालुंजकर, भाऊपाटील नवले, राजेंद्र देशमुख, अर्जुन गावडे, विक्रम नवले, संतोष शेळके, बाळासाहेब ढोले, विजय भांगरे यांच्यासह तालुक्‍यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडून आ. पिचड यांचे कौतुक

मधुकरराव पिचड हे राज्यातील आदिवासी समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांनी भाजपत प्रवेश केल्याने भाजपला अधिक बळकटी, ताकद मिळेल. आ.वैभव हे सुद्धा पिचड यांची कार्बन कॉपी आहेत. वैभव हे आपले प्रश्‍न, शांत, संयमाने मांडून ते सोडवून घेत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.

विखेंनीच दाखविली वाट

ना. राधाकृष्ण विखे यांनी आम्हाला ही वाट दाखविल्याचे सांगत पिचडांनी प्रवेशामागे विखेच असल्याचा गौप्यस्फोट केला. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.