गडकरींची संपत्ती 25 कोटींची

नागपुर – भारतीय जनतापक्षाचे नागपुर मतदार संघातील उमेदवार आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक शपथपत्रात आपली एकूण चल आणि अचल संपत्ती 25 कोटी 12 लाख रूपये इतकी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सन 2017-18 या आर्थिक वर्षात आपले उत्पन्न 6 लाख 40 हजार 700 रूपये इतके असल्याचे दाखवले आहे. गडकरी यांच्याकडे दागदार्िगने, ठेवी आणि रोकड स्वरूपात 69 लाख 38 हजार 691 रूपये आहेत. त्यांच्या पत्नीकडे एकूण 91 लाख 99 हजार 160 रूपयांची चल संपत्ती आहे.

त्यांच्याकडे 6 कोटी 95 लाख 98 हजार 325 कोटींची अचल संपत्ती असून त्यांच्या पत्नीच्या नावावरील अचल संपत्ती 6 कोटी 48 लाख 60 हजार 325 इतकी आहे. त्यांच्या हिंदु अविभक्त कुटुंबाच्या नावाखालील संपत्ती 9 कोटी 40 लाख 31 हजार 224 रूपये, इतकी आहे. गडकरी यांनी आपली नागुपरातील धापेवाडा येथे 29 एकर शेत जमीन असल्याचे दाखवले आहे त्यातील 15 एकर जमीन त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. त्यांची सध्याची बॅंकेतील शिल्लक 8 लाख 99 हजार 111 इतकी आहे. तर त्यांच्या पत्नीच्या खात्यावरील शिल्लक 11 लाख 7 हजार 753 इतकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.