नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य 158 प्रवाशांना दिल्लीला घेऊन जाणारे इंडिगो कंपनीचे विमान आज खबरदारी म्हणून माघारी फिरले. विमानाचे इंजिन सुरू करण्याच्यावेळी वैमानिकाला मिळालेल्या खबरदारीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे विमान माघारी फिरवण्यात आले.
विमान सकाळी 7.50 वाजता दिल्लीला जाणार होते. मात्र विमानाने उड्डाण घेण्यापूर्वी वैमानिकाला खबरदारीचा संदेश वारंवार दिसल्यामुळे हे विमान देखभालीच्या कामासाठी माघारी आणले गेले, असे विमान कंपनीने म्हटले आहे.
मात्र या विमानाने उड्डाण केलेले नव्हते. इंजिन सुरू करण्यादरम्यान एक सावधगिरी बाळगली गेली आणि योग्य ऑपरेटिंग प्रक्रियेचे पालन केले गेले, असे कंपनीने म्हटले आहे. नियोजित विमानाऐवजी दुसरे विमान नागपूरवरून दिल्लीला पाठवण्यात आले. त्यामधून सर्व 158 प्रवासी दिल्लीला रवाना झले.