करोनाविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व सोपवण्याच्या मागणीवर गडकरींनी दिली पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला पोखरून काढले आहे. कोरोनामुळे आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण पडत असल्याचेही दिसत आहे. करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून वारंवार करण्यात येत आहे.

मात्र आता थेट भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यानेच सरकारला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या करोना माहमारीच्या काळामध्ये काहीच कामाचं नसून सध्याची करोना परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.

यावर आता नितीन गडकरींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.ते म्हणाले,’आपले पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, डॉक्टर, कंपाउंडर, पॅरामेडिकल आणि सरकारी कर्मचारी जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत आहेत. मी  काही  उत्कृष्ट काम वैगेरे करत नाही. सध्या जात, धर्म, भाषा, पक्ष मधे न आणता सर्वांनी मानवतेच्या आधारे सेवा केली पाहिजे. सर्व लोक करत असून आपणही त्यात थोडे प्रयत्न करत आहोत.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.