भाजपमध्ये गडकरी हेच एकमेव हिंमतवान नेते : राहुल गांधी

नवी दिल्ली : जो आपले घर चालवू शकत नाही तो देश काय चालवणार असा सवाल काल भाजप नेते नितीन गडकरी यांनी उपस्थित केला होता. त्याबद्दल त्यांचे कौतुक करताना गडकरी हे भाजपमधील एकमेवर हिंमतवान नेते आहेत असे वक्तव्य कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. गडकरी यांनी आता राफेल घोटाळा, मोदींकडून सुरू असलेला संस्थांचा विनाश आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरही आपले भाष्य खुलेपणाने केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

गडकरी यांनी नागपुरात अभाविप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पक्ष कार्यकर्त्यांना आधी आपले घर, कुटुंब पोरंबाळं व्यवस्थीत सांभाळावीत आणि नंतरच देश सांभाळण्याच्या गोष्टी कराव्यात असे विधान केले होते. जो घर चालवू शकत नाही तो देश काय चालवणार असा सवालही त्यांनी केला होता. त्यांनी हा मोदींना मारलेला टोमणा असावा अशी सध्या चर्चा आहे त्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी त्यांचे जाहीर कौतूक केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागच्या आठवड्यात गडकरी यांनी जो नेता आपली आश्‍वासने पुर्ण करीत नाही त्याला जनता झोडपून काढते असे विधान केले होते त्याचेही कॉंग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी स्वागत केले होते. प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनाच्यावेळी राहुल गांधी हे नितीन गडकरी यांच्या शेजारच्या खुर्चीत बसलेले दिसले होते व त्यावेळी दोघांमध्ये बरीच दिलखुलास चर्चा झालेली अनेकांना पहायला मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक करण्याला विशेष महत्व दिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)