नक्षलवाद्यांना भीक न घालता गडचिरोलीत उत्साहात मतदान

गडचिरोली: आज राज्यात विधानसभेसाठी मतदान झाले. महाराष्ट्रात २८८ जागांवर मतदान झाले. दरम्यान, नक्षलवादाचा धोका असलेल्या गडचिरोलीत नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीमध्ये पोस्टर व बॅनरच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र रेगडी हद्दीतील मौजा वेंगणुर येथील बूथ सुरक्षेच्या कारणास्तव रेगडी येथे हलविण्यात आले.

नागरिकांनी ३ किमीच्या जंगलातून तसेच वाटेत येणाऱ्या कन्नमवार जलाशयाच्या नाल्यातून बोटीने प्रवास करत आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावला. तसेच लोकशाहीवर आमचा विश्वास असून नक्षलवाद्यांच्या भूलथापांना कधीच बळी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.