गडचिरोली- नक्षली नेता सृजनाक्का नुकतीच एका चकमकीदरम्यान पोलीसांकडून मारल्या गेली. या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी आज 20 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदची घोषणा एक आठड्यापूर्वी केली होती. या बंदच्या पार्श्वभूमिवर सावरगाव पोलीस मदत केंद्राअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर गजामेंढीच्या जवळ त्रिशूल पाइंट वर रात्रि 12 ते 1 वाजताच्या सुमारास छत्तीसगढ़ मधुन रेती वाहतूक करणा-या चार ट्रकला आग लावून पेटवून दिले. यानंतर या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.
यात तीन हायवा व एका ट्रकचा समावेश आहे. चारही वाहने गडचिरोली येथील एका रेती कंत्राटदाराचे असल्याची माहिती आहे. सदर ट्रक वर श्री साई ट्रांसपोर्ट गडचिरोली असे लिहीले आहे. नक्षल्यांनी ट्कच्या चालक व सहका-यांना ऊतरवून तिथून निघून जाण्याची सूचना केली. त्यानंतर चारही वाहनांना आग लावली. रात्रि अचानक मोठा धूर व ट्रकचे टायर फुटल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरीकांना घटनेचा अंदाज आला. सकाळी ही बातमी सर्वत्र पसरली.
जवळ-जवळ एका कंपनीच्या संख्येने असलेल्या नक्षल्यांनी रात्री ऊशीरापर्यंत घटनास्थळावर धुमाकूळ घातला. रस्त्यावर निषेधाचे नारे लिहील्या गेले. झाड कापून त्यावर लाल नक्षली संदेश असलेले बैनर लावले असुन त्यावर 2 मे च्या सिनभट्टी चकमकीचा निषेध करीत सृजनाक्काच्या मृत्यूच्या प्रित्यर्थ श्रद्धांजलि अर्पण केली आहे. सुरूवातीला 20 मे या एकाच दिवशी पाळण्यात येणारा बंद पूढे वाढवित 22 मे पर्यंत घोषित केला आहे. या बंदच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात नक्षली दहशत पुन्हा वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे स्पष्ट होते.