मुंबई – बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट ‘गदर 2’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ रिलीज होऊन जवळपास 17 वर्षांनंतर निर्माते ‘गदर 2’ लोकांसमोर आणत आहेत.या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी पुन्हा एकदा ऑनस्क्रीन पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
अशात गदर 2 रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. गदर 2 चा एक सीन पंचकुलाच्या एमडीसीच्या गुरुद्वारा श्री कुहानी साहिबमध्ये शूट करण्यात आला आहे.
या दृश्यात सनी देओल आणि अमिषा पटेल एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत, ज्यावर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने प्रश्न उपस्थित केला आहे. SGPC ने सनी देओल तसेच चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.