पुणे – बहुप्रतीक्षित आणि बहुप्रलंबित अशा ग.दि. माडगुळकरांच्या स्मारकाची घोषणा गुरुवारी महापौरांनी केली. पुणे महापालिकेच्या वतीने कोथरूड परिसरात गदिमांचे स्मारक उभे राहणार असून, महिनाभरात स्मारकाचे भूमीपूजन होणार आहे.
आधुनिक वाल्मिकी आणि प्रख्यात साहित्यिक अशी ओळख असणारे ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकाची चर्चा मागील सुमारे 40 वर्षांपासून सुरू होती.
मात्र, या स्मारकाला मुहूर्त मिळत नव्हता. त्यामुळे किमान जन्मशताब्दी वर्षात स्मारक व्हावे, अशी मागणी रसिकांकडून करण्यात येत होती.
अखेरीस कोथरूडमध्ये स्मारक होणार असून, त्याचे काम वेगाने होणार असल्याची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत केली.