सुपा -बीएसएनएलची इंटरनेट सेवा सुपा परिसरात गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे बॅंका, पतसंस्था, कॅफे, सेतू, सुविधा केंद्र व सरकारी व निमसरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे.
मागील आठवड्यात सुपा येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी खोदाई करताना बीएसएनएलची केबल तुटली आहे. मात्र दुरुस्तीचे काम वेळेत न केल्याने मागील चार दिवसांपासून सुप्यात इंटरनेट सेवा बंद आहे. गेल्या दीड दोन महिन्यांनंतर आता कुठेतरी बाजारपेठ उघडली आहे. जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहात असतानाच बीएसएनएलच्या धीरे चलो रे मुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सुपा ही पारनेर तालुक्यातील 10 ते 12 गावांची सर्वाअंत मोठी बाजार पेठ आहे. तसेच एमआयडीसीतील शेकडो कंपन्यांचे व्यवहार सुप्यातील बॅंका व वित्तीय संस्थांत होत आहेत. मात्र इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे व्यवहार करताना अनंत आडचणी येत आहेत. त्यातच करोना संसर्गाने अनेक जण व्यवहार हे ऑनलाईन करत आहेत.
मात्र चार दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने सर्वसामान्यांसह व्यापारी व संस्था चालकांना अनंत आडचनींना तोंड द्यावे लागत आहे. नेट बंद आसल्याने जसे व्यवहार बंद आहेत, तसेच या बंदमुळे शासनाचा खूप मोठा महसूल बुडत आहे. याबाबत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, दोन ठिकाणी केबल तुटली आहे. लवकरच इंटरनेक सेवा सुरू करू, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.