केंद्राकडून निर्बंध आणखी शिथिल; वाचा सविस्तर…

नवी दिल्ली – देशात करोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असून करोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणदेखील सातत्याने वाढ आहे. यामुळे आता केंद्र सरकारकडून निर्बंध आणखीन शिथिल करण्यात आले आहेत.

यापूर्वीच चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे आता अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे आदेश 1 ते 28 फेब्रुवारीपर्यत लागू असणार आहेत. याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून एसओपी जाहीर करण्यात आला आहे.

गृह मंत्रालयाने नवी एसओपी जाहीर करत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. हे निर्देश 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत.

त्याचबरोबर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेंमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल.

राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय प्रवासादरम्यान वस्तू नेण्यास कोणतेही प्रतिबंध असणार नाही. यासाठी कोणत्या वेगळ्या परवानगीची गरज नाही. तसेच आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्यावर जोर देण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.