गंमत अजयच्या सेल्फीची 

सेल्फी ही आजच्या काळातील क्रेझ बनली आहे. किंबहुना या क्रेझचे रुपांतर आता सेल्फायटिस नावाच्या आजारात झाले आहे. अगदी पाच-सात वर्षांची चिमुरडी मुलेही सेल्फी काढताना दिसतात.

सिनेकलाकारांना तर कुठेही गेले की “एक सेल्फी प्लीज’ अशी प्रेमळ विनवणी चाहत्यांकडून हमखास केली जाते. अशा काळात जर बॉलीवूडमधील एखाद्या कलाकाराला नीट सेल्फी काढता येत नाही, असे सांगितले तर…? विश्‍वास बसणार नाही ना? पण बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगण याच्याबाबत हा खुलासा त्याची पत्नी काजोलनेच केला आहे.

मध्यंतरी काजोल अजय देवगणला सेल्फी कसा काढतात हे शिकवताना दिसली. तिनेअलीकडेच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून त्यामध्ये ती जिन्यावर बसलेली दिसत आहे. या फोटोच्या खाली कॅप्शन लिहिले असून त्यावरून काजोलला अजय देवगणनेही या फोटोत असायला हवे असे वाटत होते. काजोलने जेव्हा अजयला हे सांगितले तेव्हा तो म्हणाला, “तिकडे जाऊन बस, मी काढतो फोटो तुझा.’ त्यावर काजोल म्हणाली, सेल्फी म्हणजेदोघेजण सोबत असतात आणि एक जण फोटो काढतो. या फाटोवर अजयने लिहिले आहे की, हा माझ्या पद्धतीचा सेल्फी आहे ज्यामध्ये मी नेहमी मागेच राहतो !

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.