पाबळच्या बलुतेदार क्रांती संघटनेकडून वृद्धेवर अंत्यसंस्कार

पी.पी. किट धारण करून केला अंत्यसंस्कार

पाबळ (प्रतिनिधी) बलुतेदार क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पी पी किट धारण करून एका वृद्धेचा अंत्यसंस्कार पार पाडला. पाबळ जवळील एका वस्तीवर एका वृद्धेचा मृत्यु झाला. 

त्या कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनाबधित असल्याने वस्तीवरील नागरिकही कोरोना संसर्गाचे भीतीने अंत्यसंनसंस्कारास पुढे येत नसल्याने ही जबाबदारी उचलून या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा विधी पार पाडला.

यावेळी सरपंच मारुती शैळके, माजी सरपंच सोपान जाधव, सदस्य ऋषिकेश कोल्हे, यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायत कर्मचारी फक्कड थोरवे , संघटनेचे सदस्य संजय शेम्बडे, सोमनाथ हरिहर,सोमनाथ सुतार यानी अत्यसंस्कार पार पाडला.

पीपी किट,सॅनिटायझर,हॅन्डग्लोज याचा वापर करून घरा पासून अंबुलन्स मध्ये मृतदेह आणून,चिंता रचण्यापासून अग्निडाग ही सर्व संस्कार पार पाडण्यात आले,त्यांनतर सर्व परिसर सॅनिटायझरने निर्जंतुक करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.