सांगली – सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथे एका ३५ वर्षीय करोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे गाव पूर्णपणे सील करण्यात आले असून गावातील ३० जणांचे संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे.
संबंधित करोनाबाधित व्यक्तीचा मुंबईत मृत्यू झाला होता. त्याचे स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा मृतदेह गावी पाठविण्यात आला होता. त्याच्यावर दि. १७ एप्रिल रोजी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
दरम्यान, संबंधित म्रुत व्यक्ती करोना पॉझिटीव्ह असल्याचे काल बुधवारी (ता.22) रोजी निष्पन्न झाले. यांनतर प्रशासनाने ताबडतोब खेराडे वांगी गाव सील करून गावातील ३० जणाना संस्थात्मक क्वारंन्टाईन केले आहे. सर्वांचे गुरुवारी स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.