इस्लामपूरमधील कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा

इस्लामपूर  – शहरातील प्रलंबित विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी राज्य सरकारला साकडे घातले आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचे पारितोषिक, डांबरीकरण, भुयारी गटाराच्या कामाला मुदतवाढ, तसेच अपूर्ण विकास कामासाठी त्वरित निधी द्या, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक विश्‍वास डांगे, माजी नगरसेवक सदानंद पाटील यांनी निवेदन दिले. नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विविध विकास कामांना गती मिळण्यासाठी आग्रह धरण्यात आला. शहरातील विविध प्रभागांत रस्त्याची कामे निधीअभावी अपुरी आहेत. भुयारी गटारासाठी मलनिस्सारणाच्या

जागा हस्तांतरणाबाबाबत चर्चा झाली. भुयारी गटाराच्या कामासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या भुयारी गटाराचे काम बंद आहे. भविष्यात पावसाळ्यात या कामाला विलंब लागला तर पुन्हा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सर्वाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री जयंत पाटील यांचा आग्रह आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक त्यादृष्टीने कार्यरत झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.