“एचसीएमटीआर’ रस्त्यासाठी आणखी एक पाऊल

निधी उभारण्यासाठी बंगळुरू येथील सल्लागाराची नियुक्ती

पुणे – शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय ठरणाऱ्या उच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग अर्थात हाय कॅपिसिटी मास ट्रान्झिट रूट (एच.सी.एम.टी.आर.) साठी सुमारे 6 ते 7 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी कसा उभारता येईल, तसेच त्यासाठीचे वेगवेगळे पर्याय काय असतील, याची चाचपणी करण्यासाठी महापालिकेने बंगळुरू येथील सल्लागार कंपनी निश्‍चित केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सल्लागार कंपनीस चाचपणीचे काम देण्याचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत ठेवला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे. या कंपनीने यापूर्वी बंगळुरू मेट्रो, चेन्नई रिंगरोड तसेच इतर काही शहरांच्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठीचे अहवाल तयार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

गेल्या दशकभरात पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असून 34 लाख लोकसंख्येच्या शहरात खासगी वाहनांची संख्या 36 लाखांवर गेली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध रस्ते अपुरे पडत असून वाहतुकीचा वेग सरासरी ताशी 18 किलोमीटरवर झाला आहे. या कोंडीवर उपाय शोधण्यासाठी महापालिकेच्या 1987 च्या विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेला उच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या रस्त्यासाठी तब्बल 6 ते 7 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा संपूर्ण रस्ता उन्नत (एलिव्हेटेड) असेल. सुमारे 37 किलोमीटरचा वर्तुळाकार असलेला हा रस्ता शहरातील प्रमुख 60 मार्गांना हा रस्ता जोडणारा असेल. हे काम वेळीच मार्गी लागल्यास वाहतूक कोंडीत गुदमरलेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. मात्र, या रस्त्यासाठीचे आवश्‍यक भूसंपादन आणि हा संपूर्ण रस्ता उन्नत असल्याने त्यासाठी सुमारे 6 ते 7 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एवढा निधी महापालिकेकडे नसल्याने या रस्त्यासाठी निधी उभारण्याचे पर्यायांची निश्‍चिती करण्यासाठी पालिकेने प्रस्ताव मागविले होते. त्यात दोन संस्था पुढे आल्या होत्या. त्यातील बंगळुरू येथील या संस्थेला काम देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

1 COMMENT

  1. या रसत्याने वहटूक कोंडी सुटणार नाही. बिल्डर लॉबीचे कल्याण होईल कारण सध्या बांधलेल्या सोसायट्याना या रसत्याने मोठया रसत्याना जोडले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)