नायगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

सोरतापवाडी – नायगाव ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही . सर्व मदत केली जाईल त्यासाठी सर्व नवनियुक्त सदस्यांनी सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास करावा, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायतीवर राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली श्री  काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेलने एक हाती सत्ता घेतली आहे. त्यात त्यांचे  ८ उमेदवार विजयी झाले. तर  हनुमंत अण्णा श्री काळभैरवनाथ पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले. पुणे येथे विजयी उमेदवारांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार अशोक पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेक, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी ११ जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेलची वार्ड क्रमांक ३ मधील १ जागा बिनविरोध झाली. मतमोजणी नंतर श्री काळभैरवनाथ परिवर्तन पँनेलचे १० पैकी ७ उमेदवार विजयी झाले.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे –
वार्ड क्रमांक १ – जितेंद्र चौधरी, अश्विनी चौधरी,  दत्तात्रय बारवकर.

वार्ड नं. २ आरती चौधरी, बाळासाहेव गायकवाड, प्रियंका गायकवाड (स्व.हनुमंत आण्णा गामविकास पॅनेल)
वार्ड क्रमांक ३- कल्याणी हगवणे , (बिनविरोध ) उत्तम नाना शेलार ,
संगिता शेलार.

वार्ड क्रमांक ४- गणेश चौधरी पल्लवी गायकवाड . सर्व काळभैरवनाथ परिवर्तन पँनेल

मागील पंचवार्षिक निवडणूकीत परिवर्तन पॅनेलच्या वतीने दोन वर्षात केलेली विकास ग्रामस्थांपुढे मांडण्यात आली तसेच चालू पंचवार्षिक काळात करण्यात येणाऱ्या विकास कामाचे नियोजन ग्रामस्थांपुढे मांडण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी या निवडणूकीत बहुमत दिले असून याची जाणीव ठेऊन पॅनेलच्या वतीने आगामी काळात सर्व प्रकारची विकास कामे व नाविन्यपूर्ण उपकम राबविण्यासाठी वचनवद्ध असल्याचे पॅनेल प्रमुख राजेंद्र रतन चौधरी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.