पूर, अतिवृष्टीबाधितांना घर बांधण्यासाठी मिळणार निधी

पुणे  – विभागात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाना घरे बांधण्यासाठी राज्य शासनातर्फे 220 कोटी 36 लाख 29 हजार मदत देण्यास मंजुरी मिळाली आहे. हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत दिला जाणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी 1 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.

राज्यातील विविध शहरी व ग्रामीण भागात जुलै आणि ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले होते. पुणे विभागात कोल्हापूर, सांगली, पुणे येथील बाधितांना मदत देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्णतः बाधित झालेली पक्की व कच्ची घरे, पडझड झालेली पक्की व कच्ची घरे बाधित झाली.

मोठ्या प्रमाणात 15 टक्के घरांची पडझड झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे. बाधितांच्या पुनर्वसनासाठी शासनाने पात्र कुटुंबाना ग्रामीण व शहरी भागानुसार मदत दिली जाणार आहे. सदर मदत पंतप्रधान आवास योजना, शबरी, रमाई आणि आदीम इत्यादी घरकुल योजनेखाली पीडितांनं लाभ देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.